23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रपंढरपूरला जाणा-या वारक-यांच्या वाहनांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पंढरपूरला जाणा-या वारक-यांच्या वाहनांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सध्या पावसाने जोर धरला असून प्रशासनाकडून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. दरम्यान दोन वर्षानंतर सुरू झालेल्या वारीसाठीही त्यांनी उपाययोजना केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नागरिकांच्या कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी शासनाकडून घेण्यात आली आहे.

त्याचबरोबर कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणा-या वारक-यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केला आहे. यासाठी वारक-यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

वारकरी दिंड्यांवर जास्त फोकस करा असा आदेश मुख्यमंर्त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच यासाठी निधी कमी पडणार नाही असंही ते म्हणाले आहेत. यावेळी बोलतना त्यांनी वारक-यांच्या वाहनांना टोल फ्री करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि वारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या ४ हजार ७०० बस सोडण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

वारक-यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घेण्यात आली आहे त्यामुळे यावर्षीची वारी यशस्वी होणार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये पोलिसांची महत्वाची भूमिका असते असं म्हणत त्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या