24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयशहरातील टोल होणार रद्द ; नितीन गडकरींची मोठी घोषणा

शहरातील टोल होणार रद्द ; नितीन गडकरींची मोठी घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. शहरातील टोल रद्द केला जाईल अशी घोषणा नितीन गडकरी यांनी राज्यसभेत केली आहे. त्यांचा हा निर्णय मोठा मानला जात आहे. शहरातील लोकांना १० किलोमीटरच्या रस्त्याचा वापर करण्यासाठी ७५ किलोमीटर रस्त्याचा टोल द्यावा लागतो.

त्यामुळे ही पद्धत बदलण्यात येणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यसभेत खासदारांनी टोलबाबत काही प्रश्न विचारले होते. त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देताना नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता शहरातील टोल रद्द होणार आहे. देशातील टोलनाक्यांचा जनक मीच असल्याचे देखील गडकरी यावेळी म्हणाले.

आम्ही १९९० च्या दशकात महाराष्ट्रात पहिल्यांदा मंत्री असताना त्या तत्त्वावर महामार्ग बांधल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता आपण नवी पद्धत आणत आहोत. त्यामुळे शहरी भागातील लोकांना टोल भरण्यातून वगळले जाईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.

सुदैवाने किंवा दुर्दैवाने मी या टोलचा ‘फादर ऑफ टोल टॅक्स‘ आहे. मीच या देशात बीओटीचा सगळ्यात पहिला प्रकल्प राबवला होता. तो प्रकल्प म्हणजे ठाणे-भिवंडी या दरम्यानचा असल्याचे नितीन गडकरी म्हणाले. मात्र, आता आम्ही नवीन पद्धत सुरू करत आहोत. आम्ही आता शहरातील टोल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

कारण १० किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांना ७५ किलोमीटरचा टोल द्यावा लागत असेल तर ते चुकीचे असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. पण यामध्ये माझी काही चूक नाही. ही गोष्ट दुरुस्त करण्याची गरज असल्याचे गडकरींनी सांगितले. मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टींशी मी सहमत असल्याचेही गडकरींनी सांगितले.

दरम्यान, आगामी काळात सर्व टोल प्लाझा हटवले जातील. म्हणजेच रस्त्यावर आता कोणतीही टोल लेन नसेल. टोल वसूल करण्यासाठी जीपीएसआधारित ट्रॅकिंग सिस्टीम तयार केली जात आहे. ज्यात तुम्ही टोल प्लाझा पार केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून टोलची रक्कम कापली जाईल.

यासाठी सरकार लवकरच एक धोरण आणणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी मार्च २०२२ मध्ये दिली होती. तसेच लोकांच्या सुविधेसाठी टोल लेन रद्द केली जाईल. त्याऐवजी नॅशनल हायवेवर दर ६० कि.मी.च्या अंतरावर एक टोल प्लाझा असेल. तसेच मध्येच असलेले सर्व टोल पुढील तीन महिन्यांत हटवले जातील. टोल प्लाझा हटवले गेल्याने प्रवाशांना कुठेही टोल भरण्यासाठी थांबावे लागणार नाही अशी माहिती त्यांनी मार्च महिन्यात दिली होती. तसेच लोकांचा वेळही वाचण्यास मदत होईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या