26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडशास्तीची रक्कम वसूल करण्यास चार महिन्यांपासून टोलवाटोलवी

शास्तीची रक्कम वसूल करण्यास चार महिन्यांपासून टोलवाटोलवी

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील तत्कालीन जनमाहिती अधिका-यांच्या वेतनातून शास्तीची रक्कम वसूल करून शासन खाती जमा करावी असे आदेश राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांनी दिले होते. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टोलवाटोलव करण्यात येत आहे, असा आरोप आस शिक्षक संघटनेने केला असून सीईओंना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कलम १९ (८) (क) व १९ (७) नुसार राज्य माहिती आयोगास प्राप्त अधिकारानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. तसेच कलम १९ (७) नुसार राज्य माहिती आयोगाचा निर्णय सार्वजनिक प्राधिकरणावर बंधनकारक आहे असे राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांनी दि.२ डिसेंबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णय नमूद केलेले आहे. या आदेशातील सर्व बाबींंचे गांभीर्यपूर्वक अवलोकन करून उप

मुख्य कार्यकारी अधिका-यांंनी शिक्षणाधिकारी (प्रा.) व शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद यांना आदेश दिले. सदर आदेशाद्वारे शास्तीची रक्कम संंबंधित तत्कालीन जन माहिती अधिकारी,शिक्षण विभाग यांचे वेतनातून वसूल करून शासन खाती जमा करण्याचे निर्देश दिले. तद्नंतरही दोनदा आदेश करूनही संबंधित प्रशासनाद्वारे विहित वेळेत व विहीत पध्दतीने संबंधितांकडून ,शास्तीची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही तत्परतेने होताना दिसत नाही. गेल्या चार महिन्यांपासून

संंबंधित प्रशासनाकडून वेळकाढूूूपणाचे धोरण अवलंबल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य माहिती आयोग- खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेशाचा अवमान होत आहे. आदेशानुसारची कार्यवाही करावी. आयोगाच्या आदेशानुसार आपल्या स्तरावरून विहीत वेळेत योग्य कारवाई करावी अन्यथा पुढील संवैधानिक प्रणालीकडे दाद मागावी लागेल, असे निवेदनात नमुद करून जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना आस शिक्षक संंघटनेचे प्राांताध्यक्ष युवराज पोवाडे यांनी निवेदन दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या