30.1 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeमहाराष्ट्रआजची रात्र वर्षातील सर्वांत मोठी!

आजची रात्र वर्षातील सर्वांत मोठी!

एकमत ऑनलाईन

जळगाव : पृथ्वी सूर्याभोवती आपली एक फेरी ३६५.२५ दिवसांत पूर्ण करते. ज्याला एक ‘सौरवर्ष’ असे म्हणतात. या सौरवर्षात प्रत्येक दिवस आणि रात्रीच्या काळात फरक पडतो. त्या मालेत २२ डिसेंबरचा दिवस सर्वांत लहान असतो, तो गुरुवारी (ता. २२) आहे.

सौरवर्षात कधी दिवस लहान किंवा मोठा असतो तर कधी रात्र. याचबरोबर आपल्याला विविध ऋतू बघायला मिळतात. विविध ऋतू आणि दिवस-रात्र एकसमान न राहण्याचे मुख्य कारण म्हणजे पृथ्वीचा २३.५ अंशातून झुकलेला अक्ष. पृथ्वीचे मुख्य उत्तर व दक्षिण गोलार्ध, असे दोन भाग आहेत.

पृथ्वी सूर्याभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण करीत असताना, झुकलेल्या अक्षामुळे कधी उत्तर गोलार्ध सूर्यासमोर येतो, तर कधी दक्षिण गोलार्ध. यामुळे पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश दोन्ही गोलार्धात एकसमान पडत नाही. कधी सरळ, तर कधी तिरपा पडतो.

त्यामुळे दिवस-रात्र लहान-मोठी आणि विविध ऋतू आपल्याला बघायला मिळतात. पृथ्वीच्या झुकलेल्या अक्षामुळे उत्तर आणि दक्षिण गोलार्धात एकाच वेळी दोन वेगवेगळे ऋतू सुरू असतात. दिवस-रात्रीत होणारे बदल आणि ऋतुचक्राची सुरुवात पृथ्वी सूर्याभोवती आपल्या कक्षेत फिरताना चार महत्त्वाच्या बिंदूंवर आली की होते. जसे २१ मार्च ‘वसंतसंपात बिंदू’ , २१ जून ‘विष्टंभ बिंदू’, २२ सप्टेंबर ‘शरदसंपात बिंदू’.

२२ डिसेंबर ‘अवष्टंभ बिंदू’. त्यानुसार पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याच्या प्रवासातला २२ डिसेंबर हा महत्त्वाचा बिंदू याला ‘अवष्टंभ बिंदू’ असे म्हणतात. या दिवशी उत्तर गोलार्ध दूर असल्याने त्यावर पडणारा सूर्यप्रकाश तिरपा पडतो. त्यामुळे तापमान कमी होते, म्हणून तेथे हिवाळा ऋतू असतो. तिरप्या पडणा-या सूर्यप्रकाशामुळे उत्तर गोलार्धातील २२ डिसेंबर हा दिवस सगळ्यात लहान (११ तासांचा) आणि रात्र सगळ्यात मोठी (१३ तासांची) असते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या