22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रऔरंगाबादेत तुफान पाऊस; दोघांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू

औरंगाबादेत तुफान पाऊस; दोघांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : वीज पडून औरंगाबाद जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू तर दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिशोर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, शनिवारी शहर परिसरातही पावसाने हजेरी लावली.

गेल्या काही दिवसापासून शहर व जिल्ह्यात पावसाची हजेरी कायम असून कुठे दमदार तर कुठे हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत आहे. शनिवारीही अनेक भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, कन्नड तालुक्यात मौजे नादरपूर येथे सायंकाळी सहा वाजेच्या सूमारास शेता शेजारी डोंगर कडेला वीज पडून नामदेव शेनफडू निकम (३४) यांचा मृत्यू झाला आहे.

प्रकाश तेजराव निकम (३०), दिपक विष्णू निकम (२२) हे दोघे जखमी झाले असून जखमींना पिशोर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तर औरंगाबाद तहसील कार्यालय हद्दीत असलेल्या मौजे एकोड तांडा क्रमांक तीन येथे दुपारी अडीच वाजता पाऊस सुरू असताना वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला. आनंद बद्रीनाथ चव्हाण (१६) असे त्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, वीज कोसळून वैजापूर तालुक्यातील दसकुली येथे एक गाय दगावली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या