22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रगडचिरोलीत मुसळधार ; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री घेणार पूर स्थितीचा आढावा

गडचिरोलीत मुसळधार ; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री घेणार पूर स्थितीचा आढावा

एकमत ऑनलाईन

नागपूर : गडचिरोलीसह विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळेच पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गडचिरोलीमध्ये तीन दिवसांचा रेड अलर्ट जारी केला आहे. पूर परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. ११) गडचिरोलीला येणार आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिला विदर्भ दौरा आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. आता ते मुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीचा दौरा करणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयातून रवाना झाल्याची माहिती आहे. यामुळेच दुपारची एमएमआरडीएची बैठक रद्द करण्यात आली आहे.

मागील ४८ तासांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी झाडे आणि ट्रक वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे लागू केलेल्या रेड अलर्टमध्ये सरकारी कार्यालये आणि अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने आणि सेवा बंद राहणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या