25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयदेशातील अनेक राज्यांत मुसळधार; कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ

देशातील अनेक राज्यांत मुसळधार; कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राज्यात पावसाचा जोर वाढतोच आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. तर, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. ब-याच ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. गुजरात, कर्नाटकमध्ये देखील पावसाने मोठे नुकसान केले आहे.

दरम्यान कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून कराडच्या प्रीतिसंगमावर नदीची पाणी पातळी वाढली आहे. सध्या धरणातून काही प्रमाणात विसर्ग सुरू आहे.

कर्नाटकात पावसामुळे ३२ जणांचा मृत्यू
कर्नाटकात पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत ३२ जणांना जीव गमवावा लागला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लोकांच्या मदतीसाठी तातडीने ५०० कोटी रुपये जारी केले आहेत. आज गुरुवारी हवामान खात्याने उत्तर गोवा, दक्षिण गोव्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच कर्नाटकातील काही जिल्ह्यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. तेथील उत्तर कन्नड, उडुपी, शिमोगा, दक्षिण कन्नड, चिकमंगळूर आणि कोडागु जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात ‘रेड अलर्ट‘
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आजही पाऊस सुरूच राहणार आहे. बुधवारी मुसळधार पावसामुळे नाशिकमधील अनेक भागात पाणी साचले होते. दरम्यान, आज नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुजरातमध्येही संततधार
नवसारी जिल्ह्यातून वाहणा-या पूर्णा, कावेरी आणि अंबिका या तीन नद्या पूरस्थितीत आहेत. काल रात्री पूर्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. लगतच्या भागात ४०,००० लोक बाधित तर २५०० लोकांना सुरक्षित मदत छावण्यांमध्ये हलवले आहे..

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या