नवी दिल्ली : भारत आणि मलेशियामध्ये भारतीय चलनात व्यापार करण्यासाठी एक महत्त्वाचा करार झाला आहे. भारत आणि मलेशिया यांच्यातील व्यापारासाठी आता भारतीय चलनाचा वापर करण्यात येईल. भारत आणि मलेशिया मधील व्यापार अमेरिकन डॉलर मध्ये होत होता. आता तो भारतीय चलनातही होणार असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारताच्या परकीय चलनाच्या वापराने भारताच्या परकीय चलन साठा मजबूत होण्यास मदत होईल व त्यावरचा दबाव कमी होईल. आणि विशेष म्हणजे यातून डॉलर्सचीही बचत होईल. ३१ मार्च रोजी जाहीर झालेल्या नवीन परकीय व्यापार धोरणात डॉलरऐवजी रुपयात परकीय व्यापार वाढवण्यावर भर देण्याचे सांगण्यात आले होते .
जागतिक व्यापार आता भारतीय चलनात करण्यासंबंधी जुलै २०२२ मध्ये, रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला होता. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. यूएस डॉलरचा वापर जागतिक व्यापारासाठी राखीव चलन म्हणून केला जातो. स्वत:च्या चलनात व्यवसाय करण्याचे भारताचे हे पाऊल, आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरचा वापर कमी करण्यासाठी उचललेले पाऊल म्हणून पाहिले जात आहे.