18.6 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeविलग राहणे मान्य केले तरच रेल्वे तिकीट

विलग राहणे मान्य केले तरच रेल्वे तिकीट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
राज्यांनी ठरवून दिल्यानुसार विलगीकरण कालावधीचे पालन करण्याची तयारी दर्शवणाºयांनाच रेल्वेचे आॅनलाइन तिकीट दिले जाईल, असे आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे. आॅनलाइन तिकीट बुंिकग करताना आता आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर क्वारंंटाइन पॉप अप विंडो येणार असून, त्यात दर्शवणारे नियम मान्य करून क्लिक केल्यानंतरच तिकीट बुकिंगची पुढील प्रक्रिया पार पडणार आहे.

Read More  चीनविरोधात भारतासह एकवटले ६२ देश

विशेष रेल्वेगाडीने बेंगळुरू येथे पोहोचलेल्या प्रवाशांनी क्वारंटाइन होण्यास नकार दिल्याची घटना नुकतीच घडल्याने आयआरसीटीसीला हे पाऊल उचलावे लागले आहे. १४ मे रोजी दिल्लीहून बेंगळुरूमध्ये आलेल्या या जवळपास पन्नास प्रवाशांनी विलगीकरणाला नकार देत स्थानकात धुमाकूळ घातला होता. त्यांच्यापैकी १५ प्रवासी विलग न होण्यावर ठाम राहिल्याने रेल्वेला विशेष बोगी देऊन त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवावे लागले होते. त्याचा खर्च त्या प्रवाशांकडून घेण्यात आला होता. दरम्यान, रेल्वेने प्रवास करणाºयांसाठी आरोग्यसेतू हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करणेही सरकार आणि रेल्वेने नुकतेच बंधनकारक केले आहे. या अ‍ॅपद्वारे प्रवाशांचे ट्रॅकिंग करता येते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या