24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या

नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिकेची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

नाशिक : नाशिक येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या परिचारिका महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी परिचारिकेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. माधुरी टोपले (१९, रा. सुरगाणा) असे आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीचे नाव आहे.

आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. परिचारिका माधुरीने तिच्या रूममध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान तिच्या सहका-यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाणा येथील माधुरी टोपले ही मुलगी परिचारिका महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी एएनएमला शिक्षण घेत होती. रात्री हॉस्टेलमध्ये एका प्रशिक्षणार्थीचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करताना माधुरीला फोन येत होता. ती फोनवर बोलत तिच्या रूममध्ये निघून गेली. रात्री उशिरा केव्हा तरी तिने पंख्याला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे प्रशिक्षणार्थी मुलींच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ वॉर्डनला याबाबत कळवले.

दरम्यान तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधा डिया, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. निखिल सैदाणे, अधिसेविका शुभांगी वाघ हे तातडीने दाखल झाले.

माधुरी टोपले यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. माधुरी पहिल्या वर्षात शिकत होती. मनमिळाऊ व कामात तत्पर असलेल्या परिचारिकेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सरकारवाडा पोलिस घटनास्थळी येऊन पुढील तपास करीत असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

बारा दिवसांत दुसरी घटना
दरम्यान बारा दिवसांपूर्वी गुरुवारी तारवालानगरात एका परिचारिकेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. शीतल अरविंद सरोदे असे या परिचारिकेचे नाव आहे. या परिचारिकेने देखील राहत्या घरी पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. सरोदे या सिव्हिलमध्ये अतिदक्षता विभागात कार्यरत होत्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या