23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदे सरकारकडून अधिका-यांच्या बदल्या रद्द

शिंदे सरकारकडून अधिका-यांच्या बदल्या रद्द

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी ज्या प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यातील काही बदल्यांना नव्या शिंदे सरकारकडून स्थिगिती देण्यात आली आहे. यामध्ये औरंगाबादमधील बदल्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाविकास आघाडीकडून सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली औरंगाबाद महापालिकेत आयुक्त म्हणून तर सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी दीपा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर औरंगाबाद पालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पांडे यांची औरंगाबादला सिडकोत दीपा मुंडे यांच्या जागी बदली करण्यात आली होती. या सर्व बदल्या शिंदे सरकाराने रद्द केल्या आहेत. औरंगाबाद शहरासाठी ही महत्वाची घडामोड ठरली आहे.

यापूर्वी जे जीआर काढले गेले किंवा बदल्या झाल्या होत्या. त्या जुन्या महाविकास आघाडी सरकारला अनुकूल अशा होत्या. नवे सरकार आल्यानंतर ते स्वत:ला अनुकूल अशा आयएएस आणि आयपीएस अधिका-यांच्या नियुक्त्या करण्यावर भर देणार आहे. या गोष्टी सरकारमध्ये नेहमीच होत असतात.

शिवसैनिकांच्या बंडात ठाण्यानंतर सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातून झाले आहेत. त्यामुळे आता या शहराशी निगडीत असलेले आयुक्त आणि अधिका-यांची बदली स्थगित करण्यात आली आहे. या प्रकारामुळे आता यापूर्वी ज्या बदल्या झाल्या आहेत. त्या बदल्यांच्या नियुक्तींबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या