23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रकोंबड्यांच्या झुंजीला खेळाचा दर्जा द्या

कोंबड्यांच्या झुंजीला खेळाचा दर्जा द्या

एकमत ऑनलाईन

शेतक-याची उच्च न्यायालयात जनहित याचिका
नागपूर : राज्यात कोंबडा झुंजीला अधिकृत खेळाची मान्यता मिळावी, यासाठी शेतकरी गजेंद्र चाचरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. त्यांनी जनहित याचिकेद्वारे ही मागणी केली असून या संदर्भात केंद्र व राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे सचिव आणि पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर उद्या, बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

देशात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० लागू आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी २०१८ मध्ये पारंपरिक पद्धतीने कोंबडा झुंज आयोजित करण्यास सशर्त परवानगी दिली होती. कोंबडा झुंजीत धारदार ब्लेड, जुगार व सट्टा लावण्यास मनाई करण्यात आली होती. याशिवाय, आजही देशात अनेक ठिकाणी बंदी झुगारून कोंबडा झुंजी आयोजित केल्या जातात.

आंध्र प्रदेशमध्ये तीन दिवसांत ९०० कोटींची उलाढाल
२०१९ मध्ये आंध्र प्रदेश येथे कोंबडा झुंजीत केवळ तीन दिवसांत ९०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ही बाब लक्षात घेता, कोंबडा झुंजी अधिकृत केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच या खेळामुळे कुक्कुटपालन व कोंबड्यांचे देशीवाण संरक्षित करण्यास प्रोत्साहन मिळेल. देशात क्रिकेटवरही सट्टा लावला जातो.

पण त्यामुळे क्रिकेटवर बंदी आणण्यात आली नाही. तसेच कोंबड्यांच्या आहारासाठी (टीं’२) उपयोग करण्यावरही बंदी नाही. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे कोंबडा झुंजीवर बंदी लागू करणे तर्कहीन आहे, असा दावा चाचरकर यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या