27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeबीडबीडमध्ये कडकडीत बंद ठेवून मेटेंना श्रद्धांजली

बीडमध्ये कडकडीत बंद ठेवून मेटेंना श्रद्धांजली

एकमत ऑनलाईन

मेटेंच्या अपघाती निधनाने जिल्ह्यावर शोककळा, बीडमध्ये सर्वत्र शुकशुकाट
बीड : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना बीडमधील व्यापा-यांनी भावपूर्ण श्रद्धांजली देत शहरात आज कडकडीत बंद पाळला. बहुतांश व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे बीडमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.

बीडचे सुपुत्र असलेल्या विनायक मेटे यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहणी आणि शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांनी मेटे यांना श्रद्धांजली म्हणून आज दुकाने बंद ठेवण्याची विनंती व्यापा-यांना केली होती. आवाहनाला व्यापा-यांनी प्रतिसाद देत आज कडकडीत बंद पाळला.

दरम्यान, विनायक मेटे यांचे पार्थिव रविवारी रात्री बीड येथे आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी अहमदनगर रोडवरील शिवसंग्राम भवन येथे पार्थिव ठेवण्यात आले. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी नागिरक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. दुपारी १ वाजेपर्यंत शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.

दुपारी ३.३० ला अंत्यसंस्कार
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (१४ ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास बीड येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पार्थिव रात्री उशिरा बीडमध्ये आणण्यात आले. बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. शिवसंग्राम भवन येथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. अंत्यविधीसाठी राज्यभरातील कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या