24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रयावल तालुक्यात तिहेरी अपघात; पाच जण ठार, सहा जण जखमी

यावल तालुक्यात तिहेरी अपघात; पाच जण ठार, सहा जण जखमी

एकमत ऑनलाईन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे बाजारासाठी बक-­या घेऊन जाणा-­या मालवाहू मोटारीला विरुद्ध बाजूने येणा-या भरधाव मालमोटारीने उडविले. त्यात पाच जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना नशिराबाद (ता. जि. जळगाव) येथील महामार्गावरील उड्डाणपुलावर आज (बुधवारी) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

जळगावसह नशिराबाद (ता. जि. जळगाव) येथून बक-­या भरून मालवाहू मोटार (एमएच ४३, एडी १०५१) यावल तालुक्यातील फैजपूर येथे बुधवारी भरणा-या बाजारात जात होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादजवळील टोलनाक्याच्या पुढे असणा-या उड्डाणपुलाजवळ समोरून भुसावळकडून विरुद्ध बाजूने भरधाव येणा-­या मालमोटारीने (एमएच ०९, एचजी ९५२१) मालवाहू मोटारीला जोरदार धडक दिली.

यानंतर मालमोटार अजून एका मोटारीला धडकली. या भीषण तिहेरी अपघातात पाच जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या