19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयतिहेरी तलाक; सायरा बानो भाजपात

तिहेरी तलाक; सायरा बानो भाजपात

एकमत ऑनलाईन

डेहराडून : तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवणा-या सायरा बानो यांनी शनिवार दि़ १० ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उत्तराखंडच्या डेहराडून येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत आणि प्रदेश महामंत्री संघटन अजय कुमार यांच्या उपस्थितीत त्यांना पार्टीचे सदस्यत्व देण्यात आले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष भगत म्हणाले की, बानो यांनी ज्या प्रकारे तीन तलाक विरोधात आवाज उठवला, तशाच प्रकरे त्या पक्षाच्या सिद्धांत पुढे घेऊन जातील. विशेषकरून अल्पसंख्याक समाजातील महिलांपर्यंत भाजापाचे विचार पोहचवण्यात त्यांचे महत्वाचे योगदान राहील. बानो यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर म्हटले आहे की, जर त्यांना संधी मिळाली तर त्या २०२२ मध्ये होणारी उत्तराखंडमधील निवडणूक देखील लढवतील.

जर पक्ष मला पुढे नेत असेल, तर मी बिहारमधून भाजपासाठी राजकीय कार्याची सुरूवात करू इच्छित आहे. असे बानो यांनी सांगितले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात दमदार पाऊस; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या