19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeबीडबीड जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड, दोघांना जन्मठेप

बीड जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड, दोघांना जन्मठेप

एकमत ऑनलाईन

बीड : जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोमा शेरू भोसले आणि लखन प्रताप भोसले अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. पती-पत्नी आणि त्यांच्या गरोदर मुलीचा दोन्ही आरोपींनी खून केला होता. या प्रकरणी २२ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधिश हेमंत महाजन यांनी दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील सरस्वती कॉलनीत भवानी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरी सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत घाडगे दाम्पत्याची हत्या केली होती. त्यावेळी त्यांच्या दोन मुलींवर देखील हल्ला केला होता. उपचारादरम्यान गरोदर मुलीचा मृत्यू झाला होता. पाच वर्षांपूर्वी ही धक्कादयक घटना घडली होती. या हत्याकांडाने बीडसह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती. घटनेनंतर या प्रकरणी न्यायालयात केस सुरू होती. त्यावर आज सुनावणी करत दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

गेवराई शहरातील गणेशनगरमधील सरस्वती कॉलनीत बँक अधिकारी आदिनाथ उत्तमराव घाडगे (५०) राहत होते. २४ ऑगस्ट २०१७ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास दरोडेखोरांनी कटावणीने कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी आदिनाथ आणि त्यांची पत्नी अलका घाडगे ( वय, ४२) यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. त्यानंतर त्यांची बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव ( २२) आणि स्वाती घाडगे ( १८) या दोन्ही मुलींवरही धारदार शस्त्राने हल्ला करून ऐवज लुटला होता. यात जखमी वर्षाचा उपचारादरम्यान वर्षभरानंतर मृत्यू झाला होता. गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. त्यानंतर सोमा शेरू भोसले (रा. केकतपांगरी ता. गेवराई, हमु. अचानकनम गेवराई) आणि लखन प्रताप भोसले (रा. कौडगा घोडा ता.परळी) यांना अटक केली होती. आरोपींकडून घाडगे यांच्या घरातून चोरून नेलेला मोबाइल हस्तगत केला होता. तपास करून उपाधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या