17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयट्रकने अनेक लोकांना चिरडले, बिहारमध्ये १५ ठार

ट्रकने अनेक लोकांना चिरडले, बिहारमध्ये १५ ठार

एकमत ऑनलाईन

हाजीपूर : बिहारच्या वैशालीमध्ये भीषण अपघात घडला असून, एका अनियंत्रित ट्रकने अनेक लोकांना चिरडले. त्यामुळे तब्बल १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप अधिकृत आकडा आलेला नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच धावपळ उडाली होती.

महनार-हाजीपूर मुख्य मार्गावर हा अपघात झाला. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसही दाखल झाले आणि ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. महनार मोहद्दीनगर एसएचवरील ब्रम्हस्थानाजवळ लोक भुईया बाबांची पूजा करत होते. त्यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना ट्रकने चिरडले. यात १५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिस आणि ग्रामस्थांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये हलवले. अपघातानंतर ट्रक समोरील पिंपळाच्या झाडावर जाऊन आदळला. चालक ट्रकमध्येच अडकला असल्याचे सांगण्यात आले. ट्रकच्या केबिनमध्ये आणखी काही जण असल्याची शक्यताही वर्तवली. मात्र, अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी उसळली. चालक नशेत असल्यानेच ही दुर्घटना घडली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या