पुणे : पुण्यातील वडगाव पुलावर मोठा अपघात घडला आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक उड्डाणपुलावर ब्रेक फेल झालेल्या ट्रकने समोर असलेल्या दहा ते बारा वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात पोलिसांच्या वाहनाचा देखील समावेश आहे.
हा अपघात आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला असून या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.