32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeआंतरराष्ट्रीयट्रम्प आणि पत्नीत घटस्फोटाचे वारे

ट्रम्प आणि पत्नीत घटस्फोटाचे वारे

सत्तेनंतर पत्नीही सोडण्याच्या तयारीत

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांना निर्णायक आघाडी मिळाली आणि निकाल जाहीर झाला. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावे लागणार हे स्पष्ट झाले. मात्र ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केल्याचे दिसत नाही आहे. यातच आता ट्रम्प यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प डोनाल्ड यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्याने डेली मेलने हे वृत्त दिले आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांचा घटस्फोट होणार आहे. हा घटस्फोट डोनाल्ड नाही तर मेलेनिया देणार आहे. असे सांगितले जात आहे की, दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे. व्हाइट हाउसमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आली नाही आहे. मात्र सुत्रांनी अशी शक्यता वर्तवली आहे की व्हाइट हाउस सोडताच दोघांमध्ये घटस्फोट होऊ शकतो.

दुसरीकडे, शनिवारी संपूर्ण देश बायडन यांना शुभेच्छा देत असताना ट्रम्प मात्र गोल्फ खेळण्यात व्यस्त होते. त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. ट्रम्प गोल्फ खेळण्यासाठी गेले असतानाही त्यांच्यासोबत मेलेनिया दिसल्या नाहीत.

मुंबईत ड्रग्स पेडलरसह ५ जण अटकेत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या