वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : जगाच्या नजरा ऑक्सफर्डच्या लसीकडे आहेत. मात्र अमेरिकेचं लक्ष २२ ऑक्टोबरकडे लागलंय. कारण, ३ नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्याआधी लस मिळवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्ण यंत्रणा लसीच्या कामात झोकून दिलीय. कोरोनाची लस फक्त अमेरिकन लोकांचे जीवच नाही, तर ट्रम्प यांची सत्ता वाचवण्यासाठी सुद्धा महत्वाची आहे. म्हणूनच अमेरिकेत २२ ऑक्टोबरला फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनची बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाच्या लसीच्या प्रगतीबाबत चर्चा होणार होईल. मात्र २२ ऑक्टोबरआधीच कोरोनाच्या लसीसाठी अमेरिकेनं हालचाली सुरु केल्या आहेत.
मॉडर्ना आणि फायझर या दोन्ही लसी अमेरिकेसाठी महत्वाच्या आहेत. दोन्ही लसींच्या तिस-या टप्प्याचे निकाल प्रतीक्षेत आहेत. न्यूयॉर्कसारखं आर्थिक केंद्र कोरोनापासून सावरतंय. मात्र त्याजागी कॅलिफोर्निया, टेक्सास आणि फ्लोरिडा हे तिन्ही राज्यं कोरोनाची नवी केंद्र बनतायत.
ट्रम्प यांच्या चिंतेची गोष्ट म्हणजे हे तिन्ही राज्यं अमेरिकेतली सर्वाधिक लोकसंख्येची राज्यं आहेत. त्यात कॅलिफोर्नियाच्या सिनेटर म्हणून खुद्द कमला हॅरिस यंदा डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक मैदानात आहेत. या तिन्ही राज्यांमध्ये ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षाला फटका बसला, तर ट्रम्प यांना सत्तेत कमबॅक करणं अडचणीचं आहे. म्हणून मतदानाआधीच डोनाल्ड ट्रम्प कोरोनाच्या लसीची घोषणा करण्यासाठी आतूर झाले आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमात महामारी व्यवस्थापन विषयाचा समावेश -डॉ. विनोद कुमार पॉल