मुंबई : आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली झाली आहे. मात्र अद्याप त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंडेंची बदली करण्यात आली आहे. कोणत्या विभागात बदली झाली याबाबत अजुनही स्पष्टता नाही.
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. आयुक्त, कुटुंबकल्याण संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदावरुन त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे; मात्र, कुठे बदली होणार हे अजून स्पष्ट नाही. तुकाराम मुंडे यांची बदली झाली आहे, पण अद्याप नव्या जागेवर पोस्टिंग नाही. तुकाराम मुंडे यांच्या बदलीचा विक्रम झाला आहे. आतापर्यंत १६ वर्षात तुकाराम मुंडेंच्या २० पेक्षा जास्त वेळा बदली झाली आहे. दोन महिन्यापूर्वीचे तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. स्पटेंबर २०२२ मध्ये तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात होती. या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढेंचा प्रयत्न होता. मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. दोन महिन्याच्या आत मुंडे यांचा कार्यभार काढला.