24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रटीईटी घोटाळा प्रकरणातील तुकाराम सुपेची जामिनावर सुटका

टीईटी घोटाळा प्रकरणातील तुकाराम सुपेची जामिनावर सुटका

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षक भरती परीक्षा घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे याला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. सुपे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष होते. डिसेंबर महिन्यात पुणे सायबर पोलिसांनी त्याला केली होती.

टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं होतं. आरोपी सुकाराम सुपे , सुखदेव ढेरेसह १५ जणांविरोधात ३,९९५ पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. या प्रकरणातील प्रितेश देशमुखसाही याआधी जामीन मंजूर झाला होता.

२०१९-२० साली झालेल्या टीईटी परीक्षेमधील गैरव्यवहाराचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. या परिक्षेच्या निकालातील अंतिम १६ हजार ७०५ पात्र परीक्षार्थ्यांचे कंपनीकडील डाटासंबंधी तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींकडून मिळालेला डिजिटल पुराव्याचा एकत्रित तपास सुरू आहे.

तसेच परीक्षार्थींचे ओएमआर शिटस याचा तपास करून एकूण सात हजार ८८० अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी त्यांच्या मूळ गुणांमध्ये वाढ करून त्यांना पात्र केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या