24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रबारावीचा निकाल ९४.२२ टक्के

बारावीचा निकाल ९४.२२ टक्के

एकमत ऑनलाईन

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही भरघोस लागला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२० च्या तुलनेत हा निकाल एकूण ३.५६ टक्क्यांनी वाढला आहे.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १४ लाख ४९ हजार ६६४ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – १४,४९,६६४
एकूण परीक्षा दिलेले विद्यार्थी – १४,३९,७३१
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १३,५६,६०४
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी – ९३.२९
एकूण उत्तीर्ण विद्यार्थिनींची टक्केवारी – ९५.३५

निकालाची वैशिष्ट्ये :
सर्वाधिक निकाल कोकण विभाग – ९७.२१ टक्के
सर्वांत कमी निकाल मुंबई विभाग – ९०.९१ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रमांचा निकाल ९८.८० टक्के
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – ९५.२४ टक्के

शाखानिहाय निकाल :
विज्ञान शाखा – ९८.३० टक्के
वाणिज्य शाखा – ९०.५१ टक्के
कला शाखा – ९१.७१ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम – ९२.४० टक्के

विभागनिहाय टक्केवारी :
कोकण – ९७.२१ टक्के
पुणे- ९३.६१ टक्के
नागपूर – ९६.५२ टक्के
औरंगाबाद – ९४.९७ टक्के
मुंबई- ९०.९१ टक्के
कोल्हापूर -९५.०७ टक्के
अमरावती – ९६.३४ टक्के
नाशिक – ९५.२५ टक्के
लातूर – ९५.२५ टक्के

बारावीत यंदाही कोकण विभागाची बाजी
बारावीचा यंदाच्या वर्षीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने या निकालात बाजी मारली आहे. राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला असून निकालात मुलींनी बाजी मारली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२०च्या तुलनेत हा निकाल एकूण ३.५६ टक्क्यांनी वाढला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या