25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयकोळसा घेऊन जाणा-या मालगाडीचे १२ डबे उलटले

कोळसा घेऊन जाणा-या मालगाडीचे १२ डबे उलटले

एकमत ऑनलाईन

इटावा : कोळशाच्या तुटवड्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये विजेचे संकट निर्माण झाले आहे. एकीकडे औष्णिक वीज केंद्रांवर कोळशाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकार अनेक पावले उचलत असताना दुसरीकडे मालगाडीचे १२ डबे उलटले आहेत. इटावा जिल्ह्यात हा अपघात झाला आहे.

कोळशाने भरलेली मालगाडी कानपूरहून गाझियाबादच्या दिशेने कोळसा घेऊन जात होती. या मालगाडीचे सुमारे १२ डबे इटावा जिल्ह्यातील फ्रेट कॉरिडॉरवर रुळावरून घसरले असून हे डबे कोळशाने भरलेले होते. सुमारे डझनभर डबे उलटल्यानंतर कोळसा सर्वत्र पसरला होता. यात रेल्वे ट्रॅकचे नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे अधिका-यांसह पोलिस प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. हा अपघात ओएचई पोल ६१५/२१ ते ६१५/२७ दरम्यान रेल्वे स्थानकाजवळ झाला आहे.

या अपघातात दोन खांबही तुटून पडले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, कोळशाचे डबे मधूनच तुटले आहेत. घटनास्थळी पोहोचलेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ग्रामीण सत्यपाल सिंह यांनी सांगितलं की, सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या रेल्वेचे डबे हटविण्याचे काम सुरु आहे. या अपघाताची माहिती वरिष्ठ अधिका-यांना देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या