24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeफोगाट मृत्यूप्रकरणी दोघे अटकेत

फोगाट मृत्यूप्रकरणी दोघे अटकेत

एकमत ऑनलाईन

दोन्ही पीएंवर संशय, शरीरावर जखमा झाल्याचे स्पष्ट
पणजी : भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना अटक केली आहे.

सोनाली फोगाट यांच्या शवविच्छेदनात त्यांच्या शरीरावर जखमा झाल्याचे दिसून आले होते. त्यावरून सोनाली फोगाट यांची हत्या ही नैसर्गिक नसून हत्या असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. तसेच त्यांच्या भगिनीनेदेखील हत्याच केली असावी, असा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे चौकशी सुरू करण्यात आली असून, या प्रकरणी फोगाट यांच्या दोन्ही पीएंना अटक करण्यात आली आहे.

सोनाली फोगाट या भाजपच्या नेत्या होत्या. त्यांचा जन्म हरियाणातील भूथनकला या गावात झाला होता. २००६ मध्ये त्यांनी दूरदर्शनसाठी काम सुरू केले. त्यानंतर २००८ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चित्रपटसृष्टीसोबत राजकारणही सुरू केले. पंजाबी, हरियाणवी चित्रपट, संगीत व्हीडीओत काम केले. छोरियां छोरों से कम नाही होती हा त्यांचा पहिला चित्रप. २०१६ मध्ये त्यांच्या पतीचा रहस्यमय मृत्यू झाला.

दरम्यान, २०१९ मध्ये त्यांनी भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढविली. २०२० मध्ये त्या बिग बॉसमध्येही सहभागी झाल्या होत्या. भाजपच्या आक्रमक नेत्या म्हणून त्यांची हरियाणात ओळख निर्माण झाली होती. त्या गोवा दौ-यावर असताना एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यांच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा संशय व्यक्त केला. त्यावरून सध्या चौकशी सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या