26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रअमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटीत पुण्यातले दोन भाविक बेपत्ता

अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटीत पुण्यातले दोन भाविक बेपत्ता

एकमत ऑनलाईन

पुणे : अमरनाथ येथे गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एनडीआरफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, झालेल्या ढगफुटीत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दोन जणांचा समावेश आहे. पुण्यातील धायरी भागात राहणारे महेश भोसले आणि सुनीता भोसले हे अमरनाथ यात्रेत अडकले आहेत. अद्याप तिथल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने या गोष्टीला अधिकृत दुजोरा दिलेला नाहीय.

तर, तुळजापूर तालुक्यातील अणदूरमधून अमरनाथ यात्रेसाठी गेलेले अकरा भाविक सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. देशात अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. देशातील अनेक राज्यांत पूरजन्य स्थिती आहे.

तसेच काश्मीरमध्ये देखील मागच्या काही दिवसांत मुसळधार पाऊस सुरू आहे. ढगफुटी झाल्यामुे तिथे मोठा पूर आला आहे. पुरामुळे मदत कार्यात अनेक अडचणी येत असल्याची माहिती तिथल्या पथकानी सांगितली आहे.
पुरात अडकलेल्या भाविकांना वाचवण्यासाठी पथकाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या