25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयचेन्नईत मुसळधार पावसात दोघांचा मृत्यू

चेन्नईत मुसळधार पावसात दोघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

चेन्नई : परतीच्या मार्गावरील पावसाने महाराष्ट्रात धिंगाणा घातल्यानंतर आता तमिळनाडूला झोडपून काढले आहे. मंगळवारी चेन्नई आणि लगतच्या भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसामुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. उत्तर चेन्नईमध्ये विजेचा धक्का लागून एकाचा तर एका इमारतीखाली दबून महिलेचा मृत्यू झाला. तामिळनाडू सरकारने बुधवारी सकाळी चेन्नई, तिरुवल्लूर आणि रानीपेटसह ७ जिह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुटी दिली आहे.

मंगळवारी चेन्नईत झालेल्या पावसाने ३० वर्षांचा विक्रम मोडला. त्याचवेळी, गेल्या ७२ वर्षांतील हा तिसरा सर्वाधिक पाऊस आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत २४ तासांत ८ सेमी पाऊस पडला. चेन्नईमध्ये १ नोव्हेंबर १९९० ला १३ सेंटिमीटर पाऊस झाला होता. त्याआधी १९६४ मध्ये याच तारखेला ११ सेमी पाऊस पडला होता.

तामिळनाडूच्या किनारपट्टीवर १९ ला ईशान्य मान्सून पोचला. चेन्नई हवामान विभागाचे प्रमुख एस. बालचंदर यांनी सांगितले की, येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या