24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeअमेरिकेकडून मिळणार दोनशे व्हेंटिलेटर्स

अमेरिकेकडून मिळणार दोनशे व्हेंटिलेटर्स

एकमत ऑनलाईन

एकूण व्हेंटिलेटर्सची किंमत भारतीय चलनात 19 कोटी 20 लाख रुपये

नवी दिल्ली: अमेरिकेने भारतला दोनशे व्हेंटिलेटर्स पाठवायचे ठरवले आहे, असे वृत्त एका संकेत स्थळाने दिले आहे. भारताला ही भेट देणार असल्याचे अध्यक्ष ट्रम्प यांनी या आधीच जाहीर केले होते, पण त्यावेळी त्यांनी नेमके किती व्हेंटिलेटर्स पाठवणार याचा उल्लेख केला नव्हता. पण आता त्याचा उलगडा झाला आहे.

मे महिन्याच्या अखेरीला किंवा जूनच्या सुरुवातीला हे व्हेंटिलेटर्स भारतात येतील. यातील प्रत्येक व्हेंटिलेटरची किंमत 13 हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 9 लाख 60 हजार रुपये इतकी असणार आहे. या एकूण व्हेंटिलेटर्सची किंमत भारतीय चलनात 19 कोटी 20 लाख रुपये इतकी असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकन सरकारच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेतर्फे हा खर्च केला जाणार आहे. या मदतीबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आधीच ट्रम्प यांचे जाहीर आभार मानले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या