33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअबुधाबी विमानतळावर ड्रोन हल्ल्यात २ दोन भारतीयांचा मृत्यू

अबुधाबी विमानतळावर ड्रोन हल्ल्यात २ दोन भारतीयांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

अबूधाबी : संयुक्त अरब अमिरातीमध्ये एक मोठा हल्ला झाल्याचे वृत्त आहे, विशेष म्हणजे या हल्ल्यामध्ये दोन भारतीय व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अबुधाबीच्या नव्या विमानतळावर सोमवारी हा हल्ला झाला असून, तो ड्रोनमधून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इराणमधील हैती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

अबुधाबी विमानतळावरील अधिका-यांच्या माहितीनुसार, अभुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दोन स्फोट झाले. हे दोन्ही स्फोट ड्रोनच्या सहाय्याने घडवून आणल्याचे बोलले जात आहे. या स्फोटांनंतर विमानतळावर आग लागली होती. या हल्ल्यामध्ये २ भारतीय प्रवाशी आणि एका पाकिस्तानी प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर इतर सहाजण जखमी झाले आहेत, स्थानिक माध्यमांनी आपल्या वृत्तामध्ये ही माहिती दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या