वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी डॉ. विवेक मुर्ती आणि डॉ. अतुल गवांडे या दोन भारतीय वंशीयांची कोरोना नियंत्रण समितीवर निवड केली. कोरोनाच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांची एक सल्लागार समिती बनवण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी ही समिती निर्माण केली आहे. त्यात कर्नाटकात जन्मलेल्या डॉ. विवेक मुर्ती यांचा समावेश आहे.
अमेरिकेचे सर्जन जनरल या पदावर त्यांनी २०१४ ते १७ या काळात काम केले आहे. या सल्लागार समितीचे डॉ. डेव्हीड केसलर आणि डॉ. मार्केला न्युंजस्मिथ यांच्यासह ते सहअध्यक्ष असतील. दुस-या बाजूला डॉ. अतुल गावंडे यांचीही निवड करण्यात आली. डॉ. गावंडे हे बोस्टनमध्ये शल्यविशारद आहेत. त्यांनी अमेरिकेच्या आरोग्य विभागात वरीष्ठ सल्लागार म्हणून काम केले आहे. आपली निवड होताच डॉ. अतुल यांनी ही साथ संपवण्यसाठी मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या साथीला नियंत्रणात ठेवण्याचा सर्वात मोठा लढा आपले प्रशासन लढत आहे. तज्ज्ञ आणि शास्त्राला आधार धरून मी याबाबत बोलेन. हा संसर्ग रोखण्यासाठी मी सल्लागार मंडळाची नियुक्ती करेन. लस प्रभावशाली, परिणामकारक असल्याची आणि त्याचे वाटप परिणामकारकरित्या, समान पध्दतीने आणि मोफत करण्यासाठी प्रयत्न करेन, असे जो बायडेन यांनी स्पष्ट केले होते.
माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ कराल तर याद राखा