27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडमाळाकोळी परिसरात वीज कोसळून दोन ठार

माळाकोळी परिसरात वीज कोसळून दोन ठार

एकमत ऑनलाईन

माळाकोळी : जोरदार पावसात वीज कोसळून माळाकोळी परिसरात दोघांचा मृत्यु झाल्याची घटना सोमवार दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. मयतात एक महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू असून काही भागात जोरदार पाऊस होत आहे़ यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

सोमवारी दुपारी लोह्यासह माळाकोळी परिसरास पावसाने झोडपून काढले. दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास मौजे नागदरवाडी येथील महिला शेतकरी संगाबाई तात्याराव केंद्रे या शेतात काम करीत होत्या. त्याचवेळी वीजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्.ाा. काही कळायच्या आत संगाबाई यांच्या अंगावर वीज कोसळली़ यात त्यांचा मृत्यु झाला. तर नागदरवाडी येथुन काही अंतरावर असलेल्या रमणेवाडी येथे पांडुरंग कंधारे यांच्यावर वीज कोसळली़ यात त्यांचाही दुर्देैवी मृत्यु झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या