24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रदसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी सेनेकडून दोन पत्र, बीएमसी सुद्धा संभ्रमात

दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी सेनेकडून दोन पत्र, बीएमसी सुद्धा संभ्रमात

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेला नवसंजीवनी देणारा शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेला दोन पत्र लिहली आहेत. परंतु या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबद्दलचा निर्णय मुंबई महापालिकेने थांबवून ठेवला आहे. गणेशोत्सव झाल्यानंतरच मेळाव्याबद्दलचा निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सपकाळे यांनी दिले आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता जी नॉर्थ विभागाला दोन वेळा पत्र देऊनही मुंबई महापालिकेने अर्ज थांबवून ठेवला आहे. सद्यपरिस्थितीत गणेश उत्सवाच्या दरम्यान पालिकेतील सर्व स्टाफ प्रशासनिक बाबी आणि इतर तया-यांमध्ये गुंतला असल्यामुळे दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेलं आहे.

शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर दस-याच्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख सभा घेत शिवसैनिकांना आपल्या भाषणातून नवसंजीवनी आणि दिशा देतात. मात्र, यंदाच्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार का? याबाबत संभ्रम आहे.

एकेकाळचे निष्ठावंत शिवसैनिक आणि ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. शिवसेनेचे ४० आमदार आणि १२खासदार आता शिंदे गटात सामील झाले आहेत, त्यामुळे शिवेसेनेला जोरदार धक्का बसला आहे. या धक्क्यातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करणार आहेत, अनेक दौरे याअगोदरच झाले. याचाच एक भाग म्हणून शिवसैनिकांमध्ये उर्जा भरण्यासाठी यंदाच्या दसरा मेळाव्याचं महत्वं वाढलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या