रायपूर: वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठार झालेल्या एका माओवाद्यावर सरकारने ईनामही जाहीर केले होते.
Read More कोरोना संकटकाळातही चीनने केली डिफेन्स बजेटमध्ये वाढ
मंकपाल गावाजवळील जंगलात आज दुपारी १२.३० वाजता सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. हा भाग गडिराज पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येतो. जिल्हा राखीव सुरक्षा दलाचे पथक त्यावेळी माओवादी कारवायांविरोधातील अभियानांतर्गत कर्तव्यावर असताना ही चकमक झाल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली.
या भागात माओवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतली होती, अशी माहीती सुंदरराज यांनी दिली. ही चकमक सुरू झाल्यानंतर थोड्या वेळातच माओवादी जंगलात पळून गेले, असेही ते म्हणाले.