21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूर शहरात आणखी दोन कोरोना बाधित

लातूर शहरात आणखी दोन कोरोना बाधित

कव्हा रोडवरील संभाजीनगर, बरकतनगर सील

एकमत ऑनलाईन

लातूर :लातूर शहरातील कव्हा रोडवरील संभाजीनगर एक व बरकतनगरमध्ये एक, असे दोन कोरोना बाधित रुग्ण दि़ ३१ मे रोजी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली़ विशेष म्हणजे हे दोन्ही रुग्ण मोतीनगरमधील कोरोना बाधित आडत व्यापाºयाच्या आडतीवरील नोकर आहेत. संभाजीनगरमधील बाधित रुग्णासह त्याच्या ८ नातेवाईकांना उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले आहे़ दिवसेंदिवस लातूर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

कव्हा रोडवरील संभाजीनगरमधील कोरोना बाधित रुग्ण मोतीनगरमधील कोरोना बाधित आडत व्यापाºयाकडे मुनीम म्हणून काम करतो आहे़ २५ वर्षे वय असलेल्या या मुनीमाला कोरोनाची बाधा झाल्याने त्याच्यासह त्याच्या आठ नातेवाईकांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ संभाजीनगरला महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त देविदास टेकाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, उपायुक्त वसुधा फड, उपायुक्त सुंदर बोंदर यांनी भेट देऊन पाहणी केली़ क्षेत्रीय अधिकारी संजय कुलकर्णी, नगर अभियंता दिलीप चिद्रे, एस़ एऩ काजी यांनी २० घरांतील ९५ कुटूंबे राहात असलेला परिसर सील करुन थर्मल स्कॅनिंग, निर्जंतुकीकरण फवारणी केली आहे.

Read More  अलर्ट ! महाराष्ट्र अन् गुजरातवर ‘हिका’ वादळाच्या धोक्याचं सावट

बरकतनगरमध्ये अढळलेला कोरोनाबाधीत रुग्णही मोतीनगरमधील कोरोना बाधित आडत व्यापाºयाच्या आडतीवरील नोकर आहे़ ५५ वर्षे वयाचा हा रुग्ण मूळचा लातूर तालुक्यातील बोरी येथील आहे़ तो गेल्या दोन दिवसांपुर्वी बरकतनगरमधील आपल्या बहिनीच्या घरी आला होता़ रविवारी सकाळी मनपा आयुक्त देविदास टेकाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, उपायुक्त वसुधा फड, सुंदर बोंदर, आरोग्याधिकारी डॉ़ प्रशांत माले, डॉ़ बगडे यांनी भेट देऊन पाहणी केली़ क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, नगर अभियंता दिलीप चिद्रे, कर निरीक्षक तहेमीद शेख, स्वच्छता निरीक्षक अमदज शेख यांनी १९८ कुटंूब राहात असलेला ३७ घरांचा परिसर सील केला.

शहरातील कोरोना बाधितांची संख्या २३
महानगरपालिका क्षेत्रात लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत लॉकडाऊन-३ पर्यंत एकही रुग्ण नव्हता़ लातूर महानगरपालिका क्षेत्र कोरोनामुक्त होते़ त्यानंतर मात्र अचानक लातूर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत गेली़ लेबर कॉलनी, हाडको कॉलनी, मोतीनगर, देसाईनगर, कव्हा रोडवरील संभाजीनगर आणि बरकतनगर असे ६ कंटेन्मेंट झोन झाले आहेत.

कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
लातूर शहरातील लेबर कॉलनी, हाडको कॉलनी, मोतीनगर, देसाईनगर, कव्हा रोडवरील संभाजीनगर व बरकतनगर या कंटेन्मेंट झोनमध्ये महानगरपालिकेच्या वतीने माफक दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन दिल्या जात असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या