26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeऔरंगाबादेत आणखी दोन हत्या

औरंगाबादेत आणखी दोन हत्या

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : ऐतिहासिक शहर, पर्यावरणाची राजधानी यासह विविध नावांनी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराची आता मर्डर सिटी अशी नवी ओळख निर्माण होऊ पाहत आहे. शहरात दिवसागणिक, एकदिवसाआड एकतरी खून होत असून रविवारची पहाट आणखी दोन खुनांचे वृत्त घेऊनच उजाडली आहे. शहरात हिमायत बाग आणि सातारा परिसरातील राहुल नगर भागात या खुनाच्या घटना घडल्या आहेत.

बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिमायत बाग शेजारी लच्छू पहिलवान यांच्या शेताजवळ डोंगराच्या पायथ्याला अनोळखी व्यक्तीचा मृतडीच आढळला आहे. या व्यक्तीला डोक्यात धारदार शस्राने वार करून ठार मारण्यात आले असून नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याला हिमायत बाग परिसरात आणून त्याचा मृदेह जाळण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लच्छू पहिलवान यांच्या शेतातील सीसीटीव्ही कॅमे-यात एका व्यतीच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्या आहेत.

या व्यक्तीने खून केलेल्या इसमाला पांढ-या गोणीत व पोत्यात भरून गाडीवर ठेवून हिमायत बाग भागात आणल्याचे दिसत आहे. मात्र, अंधारामुळे त्या व्यक्तीचा चेहरा कॅमे-यात नीट कैद न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिवाय मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे अवघड झाले आहे. पोलिस उपायुक्त उज्ज्वला वनकर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला आहे.

सातारा पोलिसांच्या हद्दीत महिलेचा खून
हिमायत बाग परिसरात अनोळख्या व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला असतानाच सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील एका महिलेच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. मीना मच्छिंद्र्र पिटेकर (५० रा. राहुल नगर, सातारा परिसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मीनाचा पती मच्छिंद्र हा तिच्या चारिर्त्यावर सातत्याने संशय घेत होता. काल रात्री उशिरा याच मुद्द्यावर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

यावेळी चिडलेल्या मच्छिंद्रने मीनाच्या डोक्यात घरातील वरवंट्यासारख्या जड वस्तूने घाव घातला. हा घाव वर्मी बसल्याने मीना जागीच कोसळली आणि काही क्षणातच तिचा मृत्यू झाला अशी माहिती तिची मलगी शिवकन्या सिंग हिने पोलिसांना दिली. या प्रकरणी सातारा पोलिसांनी नोंद घेत तपास सुरू केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या