36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeराष्ट्रीयदाऊद कनेक्शनवरून आणखी दोघांना बेड्या

दाऊद कनेक्शनवरून आणखी दोघांना बेड्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित छापेमारीदरम्यान एनआयएने आता आणखी एक मोठी कारवाई केली आहे. एनआयएने मुंबईतील दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत. छोटा शकील याच्यासोबत व्यवहार केल्याच्या प्रकरणात एनआयएने दोघांना अटक केली. आरिफ अबू बकर शेख आणि शकील अबू बकर शेख उर्फ ​​शब्बीर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

दोन्ही आरोपी मुंबईतील ओशिवरा परिसरात वास्तव्यास आहेत. दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकील आणि अटक करण्यात आलेल्या या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. त्याच प्रकरणात एनआयएने चौकशी केली आणि त्यानंतर या दोघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींना एनआयएची टीम आज कोर्टात हजर करणार आहे. हे दोन्ही आरोपी दाऊद इब्राहिमच्या डी गँगसाठी टेरर फंडिंगसाठी मुंबईतून पैसे जमा करत असल्याचा आरोप आहे. या दोघांमध्ये आणि छोटा शकील याच्यात महिनाभरापूर्वी आर्थिक व्यवहार झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

१३ जणांची सुरू होती चौकशी
एनआयएच्या टीमने मुंबई आणि उपनगरात एकूण २९ ठिकाणी छापेमारी केली होती. ९ मे रोजी करण्यात आलेल्या या छापेमारीदरम्यान २१ वेगवेगळ्या लोकांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले. एनआयएचे पथक गेल्या ४ दिवसांपासून मुंबईतील एनआयए मुख्यालयात सुमारे १३ जणांची चौकशी करत होते. त्यानंतर आता छोटा शकीलच्या दोन हस्तकांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, आता छोटा शकील याला रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.

राजकीय नेत्यांशी संबंध!
मनी लॉंड्रिंग प्रकरणी डी कंपनीशी संबंधित असलेल्या दोन आरोपींनी आपले लागेबांधे हे राजकीय नेत्यांशी असल्याची माहिती दिल्याचा दावा एनआयएने केला आहे. दाऊद कंपनींशी संबंधित या आरोपींचे राजकीय नेत्यांसोबत आर्थिक व्यवहार होते, काही राजकीय नेत्यांची नावेही या आरोपींच्या हिटलिस्टवर होती, असा दावाही एनआयएने केला आहे.

 

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या