24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeवाईन शॉपबाहेर तैनात दोन पोलिसांना कोरोनाची लागण

वाईन शॉपबाहेर तैनात दोन पोलिसांना कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

मुंबई 16 मे : उत्पादन शुल्क विभागाने तैनात केलेल्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोनही कर्मचारी वाईन शॉप बाहेर तैनात होते. कोणत्याची प्रकारची सुरक्षेची उपाय योजना तिथे करण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यांना लागण झाल्याचं बोललं जातं आहे. यात एक पोलीस उपनिरीक्षक तर एक पोलीस कर्मचारी आहे. हे दोघही जण मुंबईतले आहेत. काही आठवड्यांपूर्वीच सरकारने दारुच्या दुकानांना उघडण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर ऑनलाईन घरपोच सेवाही सुरू करण्यात आली होती. मुंबईत १ हजारांपेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलीस आघाडीवर परिस्थिती सांभाळत लढत आहेत त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून शनिवारपासून सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच दारु पोहोचविण्यात आली. पहिल्या दिवशी राज्यातील 8,268 ग्राहकांना घरपोच दारू देण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

Read More  ग्रीन झोनच्या वाटचालीचे टरबुज फुटले

याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक कार्यालयात व अधीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्य सेवन परवाने ऑफलाईन पद्धतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. हे परवाने एका वर्षाकरिता १०० रुपये किंवा आजीवन परवान्याकरिता १००० रुपये एवढे शुल्क अदा करून मिळवू शकतात.

राज्य शासनाने महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार ही परवानगी दिली आहे. घरपोच मद्यसेवा आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात 24 मार्च, 2020 पासुन लॉकडाऊन सुरु आहे. शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी गेल्या 48 तासांमध्ये राज्यात 119 गुन्हे नोंदविण्यात आले असून 63 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या