22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रसेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला? मंत्री भुमरेंचा दावा

सेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला? मंत्री भुमरेंचा दावा

एकमत ऑनलाईन

पैठण : शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि विद्यमान सरकारचे रोहयो मंत्री आमदार संदिपान भुमरे यांनी शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील असा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. तर शिवसेनेतील ते दोन आमदार कोण आहेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, नव्या सरकारमधील मंत्री संदिपान भुमरे पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केला असून त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. तर मागच्या काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी पैठण येथे सभा घेत गद्दारांवर निशाणा साधला होता. ईडीच्या भीतीमुळे आमदार गद्दारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता मंत्री भुमरेंनी दोन आमदार फुटणार असल्याचा दावा केला असून या दाव्यानंतर शिवसेनेतील फुटणारे दोन आमदार कोण आहेत असा प्रश्न आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी ४० आमदार नेले आणि सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर शिवसेना पूर्णपणे खिळखिळी झाली असून शिवसेनेकडून शिवसंवाद यात्रा, महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.

यानंतर भुमरे यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली असून शिवसेनेशी निष्ठावंत असलेले आमदारही शिंदे गटाच्या गळाला लागणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान ईडीची भीती दाखवून आमदार फोडण्याचा भाजप प्रयत्न करत आहे असा आरोप शिवसेनेकडून होत आहे. त्याचबरोबर जे आमदार किंवा नेते शिंदे गटात दाखल झाले आहेत त्यांच्यामागील ईडी चौकशीचा ससेमिरा कमी झाल्याचे चित्र असून भुमरे यांनी दावा केलेले दोन आमदार कोण आहेत हे पहावे लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या