24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रगुहागरमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक; २५ ते ३० प्रवासी जखमी

गुहागरमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक; २५ ते ३० प्रवासी जखमी

एकमत ऑनलाईन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

चिपळूण धोपावे बस आणि गुहागर डेपोची बस अवघड वळणावर समोरासमोर धडकल्या. या धडकेत दोन्ही एसटी बसचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. मुसळधार पावसामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहे. गुहागर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरु आहे.

गुहागर तालुक्यात आज सोमवारी सकाळी हा अपघात झाला. धोपावे-चिपळूण बस आणि गुहागर डेपोची बस विरुद्ध दिशेने येत होत्या. परंतु एका अवघड वळणावर अंदाज न आल्याने दोन्ही चालकांचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस एकमेकांवर आदळल्या. अपघात एवढा भीषण होता की, एसटी बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला, ज्यात दोन्ही बसमधील चालकांना गंभीर दुखापत झाली. तर दोन्ही बसमधील २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दोन्ही बसच्या चालकांना रुग्णालयात दाखल केलं आहे. तर इतर जखमींवरही उपचार सुरु करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या