24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयबंगालमध्ये अल-कायदाच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

बंगालमध्ये अल-कायदाच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगाल एसटीएफने उत्तर २४ परगना जिल्ह्यातील सासन येथील खरीबारी भागातून प्रतिबंधित दहशतवादी संघटना अल कायदाच्या दोन संशयित सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दहशतवादी कारवाई करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सासन पोलिस ठाण्यांतर्गत खरीबारी परिसरात एसटीएफने ही कारवाई केली आहे. बुधवारी रात्री दोघांना अटक करण्यात आली आहे. एसटीएफच्या म्हणण्यानुसार, ते भारतीय उपखंडातील प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असू शकतात. एसटीएफच्या सूत्रांनी सांगितले की, अब्दुर रकीब सरकार, गंगारामपूर, जिल्हा दक्षिण दिनाजपूर येथील रहिवासी आणि हुगळी जिल्ह्यातील आरामबाग येथील रहिवासी काझी अहसानुल्ला अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कट्टरवादी साहित्य जप्त
पश्चिम बंगाल पोलिसांच्या एसटीएफने त्यांच्या ताब्यातून भारताविरुद्ध युद्ध पुकारणारे कट्टरवादी साहित्य जप्त केल्याचा दावा केला आहे. ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध यूएपीए आणि आयपीसीच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या चौकशीच्या आधारे एफआयआरमध्ये १७ जणांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. अशा प्रकारे येत्या काही दिवसांत आणखी काही अटक होण्याची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या