25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeकुलगाममध्ये चकमकीत २ दहशतवादी ठार

कुलगाममध्ये चकमकीत २ दहशतवादी ठार

एकमत ऑनलाईन

जम्मू: वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम सेक्टरमधील मंझगाम येथे सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या भागात एकूण तीन दहशतवादी लपले असल्याचे माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला घेरले आणि शोध मोहीम सुरू केली.

या मोहीमेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांना कुलगामच्या मंजगाम परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. या नंतर ३४ राष्ट्रीय रायफल्स (आरआर), केंद्रीय राखीव पोलिस बल आणि कुलगाम पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली. या परिसराला चारही बाजूंनी घेराव घालण्यात आला असून लपलेल्या दहशतवाद्यांना हुडकून काढण्याची मोहीम सुरू आहे.

Read More  कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानी

रमजानच्या पवित्र महिन्यात देखील दहशतवाद्यांच्या विरोधात लष्कराची मोहीम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जैशचा कमांडर रियाझ नायकू याला टिपले होते. त्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले. भारतीय लष्कराच्या ५३ आरआर आणि बडगाम पोलिसांनी आखलेल्या संयुक्त अभियानांतर्गत लष्कर-ए-तोयबाच्या कटाचा भांडाफोड केला होता. सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या वसीम गनीसह तीन दहशतवाद्यांना पकडले होते. या व्यतिरिक्त शोध मोहिमेदरम्यान सुरक्षादलाने इतर तीन दहशतवाद्यांनाही पकडले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या