24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeउस्मानाबादचक्रतीर्थ येथे सातवाहनकालीन दोन हजार वर्षांपूर्वीच्या विटा

चक्रतीर्थ येथे सातवाहनकालीन दोन हजार वर्षांपूर्वीच्या विटा

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहर व भोवताली सुंदर अशी प्राचीन व ऐतिहासीक ठिकाणे, वास्तू आणि मंदिरे पाहिला मिळतात. ऐरवी रुक्ष असणार्‍या या ठिकाणी पावसाळ्यात त्यातही श्रावणात अशा ठिकाणी गर्दी होते.त्यातीलच एक असणारे ठिकाण म्हणजे चक्रतीर्थ होय.शहराच्या पश्चिम दिशेला असलेल्या श्री. बोंबले हनुमान मंदिर परिसरात हे ठिकाण असून येथे जाण्यासाठी दरीमध्ये उतरावे लागते.

या तिर्थात उतरताना आपल्याला सुंदर असा ओढा दिसतो.पावसाळ्यात वरून येणार्‍या पाण्यामुळे इथे छोटेखानी धबधबा पडतो.त्यामुळे खालील बाजूस एक गोलाकार डोह तयार झाला आहे. इथे पाणी चक्राकार फिरत असल्याने याला चक्रतीर्थ नाव पडले आहे. तर काही जुन्या जाणत्या लोकांकडून वेगळ्या दन्तकथा ऐकाला भेटतात.

या तिर्थाच्या वरील बाजूस सुंदर असे छोटेखानी मंदिर आहे. यात श्री विष्णूची समपाद उभी मुर्ती असून देवाच्या हातात शंख, चक्र, गदा इ. आयुध आहेत व या मुर्ती समोरच शिवलिंग असून त्यावर पाण्याच्या कलश बांधलेला आहे.

या मंदिराच्या बाहेर वीरगळ असून काही सातवाहन कालीन म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वीच्या विटा आहेत. या मंदिराशेजारीच इतिहास व पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे यांना सातवाहन कालीन वसाहतीचे अवशेष सापडले असून त्याकाळातील विटाही त्यांना आढळून आल्या आहेत. या भागात पाणी असल्याने व जवळच धाराशिव लेण्या असल्या कारणाने इथे वस्ती केल्याच्या खुणा आहेत.

तर तीस हजार वर्षांपूर्वी मानव वापरत असलेली सुक्ष्म हत्यारेही या परिसरात सापडतात.इथे सापडलेल्या वसाहतीमुळे चक्रतीर्थ, बोंबले हनुमान परिसराचा इतिहास सुमारे दोन हजार वर्षामागे जातो. आतापर्यंत खोचरे यांना अनेक सातवाहन व प्राचीन अशा वसाहती व वस्तू, नाणे सापडल्याने जुन्या व्यापारी मार्गाचाही नव्याने अभ्यास करण्यास मिळणार आहे.

सायंकाळी इथे मोरांची संख्या बघण्यासारखी असते मोरांचा केका मोठ्याने ऐकू येतो. कारण डोंगर समोरासमोर असल्याने शले तयार होऊन आवाज ही घुमतो. जवळच हातलाई तलाव असल्याने इथे पशु-पक्षीही मोठ्या प्रमाणात दिसतात.

त्यात पानकावळा, मोर, वेडारागु, बुलबुल, बगळे, किंगफिशर व इतर कीटक पाहिला मिळतात. परिसरातील अबाल वृद्ध इथे पाय मोकळे करायला येतात. तर महिला गप्पा मारण्यात रमलेल्या असतात.काही ठिकाणी रात्री दारू पिऊन बाटल्या फोडणारेही इथे येऊन गेलेल्या खुणा दिसतात.

हजारो वर्षांपूर्वी इथे मानवी वस्ती असावी, अशा खुणा इथे आहे. वनखात्याने व नगरपालिकेने मनावर घेतले तर हे चांगले पर्यटनस्थळ होऊ शकते इथे टेबल लॅन्ड असल्याने घोडेस्वारी, चौपाटी आदी करायला वाव असल्याचे इतिहास व पुरातत्व अभ्यासक समितीचे अध्यक्ष जयराज खोचरे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या