परभणी : परभणी शहरातील पाथरी रोडकडे जाणा-या विसावा कॉर्नरवर दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. १३ रोजी सायंकाळी साडे सात वाजताच्या सुमारास घडली.
विसावा कॉर्नर जवळ दुचाकी क्रमांक एमएच २२ जी ६५९६ व दुचाकी क्रमांक एम एच २२ के ५६५ या २२ तारखेची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दोन युवक जखमी झाले तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी युवकांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.