27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeपाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : बार्शीजवळील जामगाव रोडवरील ओढ्यातील पाण्यात बुडून एकाचा, तर माढा तालुक्यातील बेंबळे येथे बंधाऱ्याच्या कठड्यास मोटारसायकल धडकून पाण्यात पडून तरुणाचा मृत्यू झाला. दोन्ही घटना मंगळवार, दि. २ ऑगस्ट रोजी घडल्या.

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी शहराजवळील जामगाव आ. रोडवरील ओढ्याला पूर आला होता. त्या पाण्यात बुडून प्रकाश विक्रम सरवदे (वय ३७, रा. बोरगाव, जि. उस्मानाबाद, सध्या पुणे) यांचा मृत्यू झाला. याबाबत सासू माया सुशील वाघमारे (४७, रा. अलीपूर रोड, बार्शी) यांनी बार्शी पोलिसांत खबर दिली. दि. २ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता प्रकाश सरवदे यांनी पत्नी शीतल यांना कॉल करून मी पुण्यात असल्याचे सांगितले. बुधवारी सकाळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतास बाहेर काढून त्याच्याजवळील मोबाईलमधून सीमकार्ड काढून दुसऱ्या फोनमध्ये टाकले. तेव्हा प्रकाशच्या पत्नीने फोन केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ही माहिती दिली. तसेच प्रकाश सरवदे यांच्या सासूंना बोलावून घेतले. सासूंना जावई असल्याची खात्री पटली. तसेच फिर्यादी आण्णा लक्ष्मण कोळी (वय २७) व आरोपी समाधान चंद्रकांत कोळी (३१, रा. बेंबळे) हे दोघे दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी वाफेगाव हद्दीतील वाफेगाव ते बेंबळे बंधाऱ्याहून जात होते.

यातील मृत समाधान चंद्रकांत कोळी याने त्याच्याकडील मोटारसायकल (एम एच४५, झेड ५०७२) हयगयीने व वेगाने चालविल्याने मोटारसायकल बंधाऱ्याच्या कठड्यास धडकली, तेव्हा समाधान कोळी हा खाली पाण्यात पडला. त्यास डोक्यास मार लागल्याने मृत झाला होता. याबाबत टेंभुर्णी पोलिसांनी आण्णा कोळी याच्या फिर्यादीवरून मृत समाधान कोळी याच्यावर दारूच्या नशेत हयगयीने मोटारसायकल चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकॉ मकबूल पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तांबोळी करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या