37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीययूएईचे अध्यक्ष शेख खलिफा यांचे निधन

यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा यांचे निधन

एकमत ऑनलाईन

दुबई : संयुक्त अरब अमिराती म्हणजे यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांचे आज निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. यूएईच्या मिनिस्ट्री ऑफ प्रेसिडेंन्शिअर अफेअर्सने आज अध्यक्ष शेख खलिफांच्या मृत्यूची बातमी जाहीर केली. शेख खलिफांच्या निधनानंतर यूएईमध्ये चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात सर्व सरकारी कार्यालयावरचे ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार असून सर्व कार्यालये आणि खासगी कंपन्याही बंद ठेवण्यात येणार आहेत. शेख खलिफा हे गेल्या काही वर्षांपासून आजारपणाशी झुंजत होते. त्यांचे आज निधन झाले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या