25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रउदय सामंत राणे समर्थकांना पोसतात

उदय सामंत राणे समर्थकांना पोसतात

एकमत ऑनलाईन

सिंधुदुर्ग : कोकणात विनायक राऊत आणि उदय सामंत यांच्यातील वादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कणकवलीत शिवसेनेच्या एका कार्यक्रमात विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. पालकमंत्री असताना उदय सामंत हे टक्केवारी घेत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय.

महाराष्ट्रात कुठेही न घडत असलेले अत्यंत घाणेरडे राजकारण रत्नागिरीतील पालीच्या घरातून उदय सामंत करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. गेल्या अडीच वर्षात पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम उदय सामंत यांनी केले. एवढेच नाही तर आमदार वैभव नाईक यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्यासाठी विरोधी उमेदवाराला ५० लाख रुपये दिले असल्याचा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर केला आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकारणीची बैठक नुकतीच कणकवलीत पार पडली. यावेळी हा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

विनायक राऊत काय म्हणाले?
शिवसेना कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना विनायक राऊत म्हणाले, ‘ राज्यात कुठेही घडत नाही, असे राजकारण रत्नागिरीच्या पाली येथे घडते. पैसे घेऊन जा, निवडणुकांना तिकिट देतो… पण माझ्याकडे अशा पद्धतीचा घाणेरडा प्रकार इथे होतो. ४० आमदार फुटले त्यापैकी ३९ आमदारांनी कधीही केला नसेल असा प्रकार इथे होतो.

अडीच वर्षात त्यांनी नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम केले. एवढेच नाही तर वैभव नाईक यांच्या विधानसभा निवडणुकीतही विरोधातील उमेदवाराला ५० लाख रुपये देऊन पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण वैभव नाईक हे अख्ख्या सिंधुदुर्गाचे वैभव आहे. दीपक केसरकर, उदय सामंत मंत्री झाले, त्यांना शुभेच्छा.. पण सामंत इथे पालकमंत्री असताना टक्केवारी घेऊन कामे करत होते.

‘वॉटर प्युरिफायर घोटाळा अंगलट येणार’
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वॉटर प्युरिफायर आणि भूमी घोटाळा यात ख-या अर्थाने जो अधिकारी होता, त्याच्या चौकशीचा अहवाल सादर करायचा होता, तेव्हा पालकमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अडकू नयेत, म्हणून ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. वॉटर प्युरिफायर घोटाळ्यात कोट्यावधी रुपयांचे घोटाळ्याचे आदेश काढण्यात आले. त्यातले २० टक्के पालकमंत्र्यांचे होते. मात्र या घोटाळ्याचे आरोप त्यांची पाठ सोडणार नसल्याचे वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या