23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना मराठा नेत्यांना मोठे होऊ द्यायचे नाही

उद्धव ठाकरेंना मराठा नेत्यांना मोठे होऊ द्यायचे नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : उद्धव ठाकरे दुजाभाव करतात. मराठा नेत्यांना त्यांना मोठे होऊ द्यायचे नाही. त्यांना संपवायचे आहे. नारायण राणे, एकनाथ शिंदे, रामदास कदम ही त्याची उदाहरणे आहेत. कुठल्याही मराठा नेत्याला ते मोठे होऊ देत नाहीत, असे गंभीर आरोप रामदास कदम यांनी केले आहेत. आज रामदास कदम आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस आहे.

त्यानिमित्त रामदास कदम बोलत होते. यावेळी मागची ३ वर्षे शिवसेनेत माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. मला बोलू दिले नाही. माझ्या खात्याअंतर्गत घेण्यात आलेले निर्णय आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले, असे आरोप कदम यांनी केले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख नव्हे तर माजी मुख्यमंत्री
रामदास कदम म्हणाले, मी उध्दव ठाकरे यांना माजी मुख्यमंत्रीच म्हणेन. मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हटले असते पण ते आज बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम करत नाहीत. तर शरद पवारांच्या मांडीवर बसून त्यांच्या विचारानुसार ते काम करत आहेत, त्यामुळे मी त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणू इच्छित नाही, असे रामदास कदम म्हणाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या