27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी आपले हिंदुत्व सोडले

उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी आपले हिंदुत्व सोडले

एकमत ऑनलाईन

मुंबई : याकूब मेमनच्या कबरीची सजावट केल्याने सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून आता या कबरीवरून एलईडी लाईट्स हटवण्यात आले आहेत. मात्र आता या प्रकरणाला राजकीय रंग लागण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी आपले हिंदुत्व सोडले अशी जोरदार टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

दरम्यान २१ वर्षांपासून शिवसेनेच्या आयटीसेलचे काम पाहणारे रमेश सोळंकी यांनी आज गुरुवारी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. यावेळी त्यांनी याकूब मेमन कबर सजावटप्रकरणी मागच्या ठाकरे सरकारचा निषेध केला आहे. तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत याची काळजी सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीचे कोरोना काळात सौंदर्यीकरण झाले. त्यावेळी उद्धव ठाकरेंना भेटायला वेळ नव्हता, अशावेळी त्यांनी याकूब मेमनच्या कबरीला अलिखित परवानगी दिली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी आपले हिंदुत्व किती सोडले हे यावरून स्पष्ट होत आहे. ज्यांनी हा देशद्रोही गुन्हा केला त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मी मागणी करत आहे. भाजप सरकारला विनंती करत आहे की सरकारने ज्यांनी सुशोभिकरण केले त्यांना तातडीने शोधून काढावे. हे गंभीर प्रकरण आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व सोडणार नाही आणि मग हे केले. या प्रकरणाचा शोध लागला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी हे कॉम्प्रमाईज का केले याचे उत्तर द्यायला हवे. तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी काय केले, राज्याचे मुख्यमंत्री का गप्प बसले, त्यांना खुर्ची टिकवण्यासाठी हे करावे लागले का? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. सरकार कारवाई करेल पण ही घटना उद्धव ठाकरे यांच्या काळात घडली त्यामुळे यात दोषी असणा-या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या