22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रनारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती

नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती

एकमत ऑनलाईन

मुंबई : नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे.

आता म्याव म्याव संपू द्या, त्यानंतर आम्ही व्याजासकट वस्त्रहरण सुरू करू असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे. नितेश राणेंच्या या आरोपानंतर खळबळ उडाली आहे.

आमदार नितेश राणे यावेळी म्हणाले की, काल नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या संदर्भातील घटनेचा उल्लेख केला आहे. यावरून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणत्या मानसिकतेचे आहेत हे महाराष्ट्राला समजले पाहिजे.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झाले ते पहिले नाही. याच्या अगोदर पण असंख्य घटना घडल्या आहेत. नारायण राणे यांनी ज्यावेळी शिवसेना सोडली, त्याच्यानंतर असे अनुभव आले असल्याचे नितेश राणे म्हणाले. म्हणून योग्य वेळ आल्यानंतर आम्ही वस्त्रहरण करू, असे नितेश राणेंनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्याबाबत वेगळी प्रतिमा घडवली जात आहे. ते आजारी आहेत, ते सोज्वळ आहेत, असे दाखवले जात आहे. पण ते जर दुस-याच्या जिवावर उठत असतील, दुस-याला मारण्यासाठी सुपा-या देत असतील तर असा माणूस स्वच्छ मनाचा नसल्याचे नितेश राणे म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या