29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंनी सैनिकांचा अपमान केला; खंडणीखोरांना समर्पणनिधी कसा समजणार? -देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

उद्धव ठाकरेंनी सैनिकांचा अपमान केला; खंडणीखोरांना समर्पणनिधी कसा समजणार? -देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.३ (प्रतिनिधी) राममंदिर समर्पण निधीवर शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जाते. खंडणीखोरांना समर्पणनिधीचा अर्थ कसा समजणार ? असा पलटवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देताना केला. ‘चीन समोर आले की पळे’ असे म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी उणे ३० डिग्री तापमानात चीन सैनिकांचा मुकाबला करून त्यांना मागे ढकळणाऱ्या शूर भारतीय सैनिकांचा अपमान केला असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार व भाजपवर चौफेर टीका केली. या टीकेला नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळजळीत प्रत्त्युत्तर दिले.

मुख्यमंत्री आपल्या तासभराच्या भाषणात जगभर फिरले. पण महाराष्ट्राबाबत मात्र ते बोलू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांना चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण या दोन्हींतील अंतर त्यांना अजूनही समजलेले नाही. शेतकर्‍यांसंदर्भात एकही मुद्दा मांडू शकले नाही. बोंडअळी, विमा, वीजतोडणी कशावरही बोलले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो शेतकर्‍यांची वीज तोडणार्‍या मुख्यमंत्र्यांना सिंधू सीमेवरील शेतकर्‍यांची चिंता आहे, असा पलटवार फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भारतीय सैनिकांचाही अपमान केला आहे. ‘चीन समोर आले की पळे’ असे म्हणून त्यांनी भारतीय सैनिकांचा मोठा अपमान केला आहे. उणे ३० डिग्री तापमानात शत्रूचा मुकाबला करून चीन सैनिकांना मागे धाडणारे आपले शूर सैनिक आहेत. त्यांचा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळाले नाही, असे सांगताना सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसलो आहोत, याचा त्यांना सोयीस्कर विसर पडतो. वीर सावरकर यांच्याबाबत ही टिपण्णी काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केल्यानंतर केली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सत्तेसाठी बसणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. यातूनच त्यांचे सावरकरप्रेम दिसून येते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात ते जे बोलले ते उसने अवसान आणून खोटे बोलले. सत्य त्यांना ठावूक आहे. या संपूर्ण भाषणात महाराष्ट्राच्या एकाही प्रश्नाला त्यांनी हात लावला नाही. शारजिलबाबत बोलण्याची त्यांची हिंमत नाही. तो पुण्यात येतो, हिंदूंना सडका म्हणून जाण्याची त्याची हिंमत होते. पण, त्याला पकडण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. मुख्यमंत्र्यांचे भाषण दिशाहिन होते. त्यांनी महाराष्ट्राची संपूर्णपणे निराशा केली. आम्ही गैरप्रकार दाखविला, भ्रष्टाचार काढला तर आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणतात. आमच्यामुळे भ्रष्टाचार बाहेर आला तरच महाराष्ट्र वाचेल. आपल्या भाषणाची चीरफाड होऊ नये, म्हणून त्यांनी आम्हाला सभागृहात बोलू दिले नाही, असा आरोप त्यांनी केला.

लातूर शहरात रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या